Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

IMG 20250910 WA0068 Sushma patil passes away : खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील यांचे निधन

नांदेड/हिंगोली | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सौ. सुषमा पाटील (वय 51) यांचे बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून त्या आजारी होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पार्थिवावर आष्टी येथे दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा कृष्णा पाटील, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

सुषमा पाटील या हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. बापुराव पाटील आष्टीकर यांच्या मोठ्या सुनबाई होत. 1991 मध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्या मनमिळावू, धार्मिक वृत्तीच्या असून विविध धार्मिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेत असत.

किडनीच्या आजारामुळे त्यांना 22 जुलै रोजी जसलोक हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर 10 सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक
भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सौ. सुषमाताईंच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व आष्टीकर कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top