HomeनांदेडGanesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे...

Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

नांदेड/मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.

amit 3 scaled Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी यावेळी अमित शाह यांच्या समवेत उपस्थित होते.

लालबाग राजा फोटो Ganesha at Lalbaug : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या गणरायाचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे (पश्चिम) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे सहकुटुंब दर्शन घेत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments