Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत

IMG20250827143647 Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात विविध वाहनातून दाखल झालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा, फटाक्याची अतिशबाजी व गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन सोहळा संपन्न झाला.सायंकाळी ठरलेल्या शुभ मुहूर्तावर ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या दिवशी जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरी वर्गही आनंदात गणेशोत्सवात सामील झाले होते.

भाद्रपद शुक्ल ४ दि.27 ऑगस्ट बुधवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत थाटलेल्या मूर्तिच्या दुकानात विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती खरेदीसाठी बाल -गोपलानी एकच गर्दी केली होती. तालुक्यातील हजारो गणेश भक्त शहरात दाखल होऊन ट्रैक्टर, ऑटो, जीप, दुचाकी, हाथगाडे आदी वाहनातून गणेशाला आपल्या गावी प्रतिष्ठापना स्थळी घेऊन जातानाचे चित्र दिसून आले.

IMG20250827104805 scaled Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत
oplus_6291488

यंदा गणरायाच्या स्वागतासाठी नवतरुण युबकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून, ढोल ताशा व फाटक्याची अतिशबाजी व डीजेच्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचा आगमन सोहळा संपन्न झाला. त्या निमित्ताने बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या विक्रीचे स्टाल, काळलावीची फुले, फळे, मक्काचे कणसे, केळीचे कंद,काकड्या यासह उपवासासाठी लागणारे केळी, सफरचंद, सेप, डाळिंब व सजावटीच्या साहित्याने बाजारातील दुकाने फुलल्याचे दिसून आले आहे.

दुपारी शहरातील कनकेश्वर तलावाच्या काठावर वसलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक गणेश मंदिरात श्रीची स्थापना पुरोहित साई बडवे आणि श्री परमेश्वर बडवे याच्या मंत्रोचार वाणीत झाली. येथील श्री परमेश्वर मंदिरात सायंकाळी ५ वाजेच्या मुहूर्तावर मानाच्या गणरायाची प्रतिष्ठापना, आरती पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंत्रोच्चार वाणीमध्ये जेष्ठ संचालक प्रकाश कोमावार यांचे सुपुत्र प्रवीण कोमावार व सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मंदिराचे संचालक अनिल मादसवार, लिपिक बाबुराव भोयर, मायंबा होळकर, मारोती हेंद्रे, पापा पार्डीकर, मोतेवार सर, राजेश्वर रायेवार, सुभाषराव कल्लूरकर, ढोणे काका, बनसोडे काका, ज्ञानेश्वर बास्टेवाड, देवराव वाडेकर, प्रकाश साभळकर, अनिल सूर्यवंशी, अनिल नाईक, आदींसह अनेक गणेशभक्त महिला – पुरुष उपस्थित होते. 

IMG20250827170719 1 scaled Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत
हिमायतनगर शहरात गेल्या 59 वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या नवप्रशांत गणेश मंडळाच्या युवकांनी गणपती बाप्पाचे जलौषात स्वागत केले. तर लकडोबा चौक, छत्रपती शिवाजी चौक, तुकामाई मंदिर, कालिंका मंदिर, श्रीराम मंदिर, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, आदीसह शहरातील सर्वच गणेश मंडळाच्या युवकांनी श्री परमेश्वर मंदिरातून ट्रैक्टरवर गणरायाची मूर्ती ठेऊन ढोल – ताश्याच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत स्थापना स्थळी नेली. सायंकाळी पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची प्रतिष्ठापना व आरती महापूजा संपन्न झाली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाने परिसर दणाणून निघाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top