Ganpati Bappa : गणपती बाप्पा मोरया च्या गजरात बाप्पाचे हिमायतनगरात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात विविध वाहनातून दाखल झालेल्या बाप्पा गणरायाचे शहरातील बाल -गोपाल व युवकांनी ढोल ताशा, फटाक्याची अतिशबाजी व गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन सोहळा संपन्न झाला.सायंकाळी ठरलेल्या शुभ मुहूर्तावर ठिकठिकाणी मंगल वाद्य व पुरोहिताच्या मंत्रोच्चार वाणीत श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शहर व ग्रामीण परिसर गणपती बाप्पाच्या जयघोषाने निनादून गेले. तर वरून राजानेही गणेश चतुर्थीच्या दिवशी जोरदार हजेरी लाऊन बाप्पाचे स्वागत केल्याने शेतकरी वर्गही आनंदात गणेशोत्सवात सामील झाले होते.
भाद्रपद शुक्ल ४ दि.27 ऑगस्ट बुधवारी अवघ्या देशभरात गणरायाचे थाटात आगमन झाले असून, गणरायाच्या स्वागतासाठी अनेक दिवसापासून दडी मारलेल्या वरून राजाने हजेरी लाऊन गणेशाचे जोरदार स्वागत केले आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावर आणि बाजारपेठेत था...

