Homeनांदेडpolice ; पोलीसांच्या प्रयत्नाने विदेशातील कंबोडीयात अडकलेला मुलगा मायदेशी परत..

police ; पोलीसांच्या प्रयत्नाने विदेशातील कंबोडीयात अडकलेला मुलगा मायदेशी परत..

नवीन नांदेड़ l शेख समीर शेख महेबुब, वय 25 वर्षे, रा.रहीमपुर वसरणी, नांदेड हे एजंट मार्फत 15 फेब्रुवारी रोजी जॉबसाठी मुंबई येथुन कंबोडीया या देशात गेले असता तिथे गेल्यावर शेख समीर यांना बेकायदेशीर क्रिप्टो करन्सी स्कॅम चे काम करण्यास सांगण्यात आले.

सदर काम करण्यास त्यांनी नकार दिला असता त्यांना तेथे सदर काम करणे बाबत त्यांचेवर जबरदस्ती करत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येवू लागली व सदर मारहाण करतांनाचे व्हिडीओ शेख समीर यांचे घरी पाठवून पैशांची मागणी करण्यात येवू लागली.यावेळी खासदार रवींद्र चव्हाण आ.प्रताप पाटिल चिखलीकर माजी आ.मोहन हंबर्डे यांच्या व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रयत्नाने शेख समीर घरी पोहोचला.

नोकरीचे आमिष दाखवित शिक्षण घेत असलेले शेख समीर यांना कंबोडिया येथे नेले या नंतर चिंतेत असलेले यांचे नातेवाईक हे मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांना भेटले व त्यांना वरील सर्व हकीकत सांगीतली असता त्यांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही सुरू करून लागलीच कंबोडीया देशातील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधला व त्यांचे संपर्कात राहूण पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील एक पत्र शेख समीर यांचे नातेवाईकांना देवून त्यांना मिनीस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कार्यालय, दिल्ली येथे तक्रार देणे कामी पाठविले तेथे जावून नातेवाईकांनी तक्रार दिली.

त्यानंतर सुध्दा अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक,नांदेड हे सदर बाबत भारतीय दुतावास कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपूरावा घेवू लागले दरम्याण पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्नांना यश आले व दि.14ऑगस्ट रोजी शेख समीर शेख महेबुब हे सुरक्षितरित्या भारतात परत आले आहेत.

आपल्या मुलास सुखरूपरित्या घरी परत आलेले पाहुण नातेवाईकांच्या डोळयात आनंद अश्रू आले त्यांनी पोलीस प्रशासनाचे व विशेषता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड ,खासदार रविंद्र चव्हाण,आ. प्रताप पाटील चिखलिकर माजी आ.मोहन हंबर्डे ,यांचे आभार मानले.

व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, यांनी शेख समीर शेख महेबुब, वय 25 वर्षे, रा. रहीमपुर वसरणी, नांदेड यांचे पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments