police ; पोलीसांच्या प्रयत्नाने विदेशातील कंबोडीयात अडकलेला मुलगा मायदेशी परत..
नवीन नांदेड़ l शेख समीर शेख महेबुब, वय 25 वर्षे, रा.रहीमपुर वसरणी, नांदेड हे एजंट मार्फत 15 फेब्रुवारी रोजी जॉबसाठी मुंबई येथुन कंबोडीया या देशात गेले असता तिथे गेल्यावर शेख समीर यांना बेकायदेशीर क्रिप्टो करन्सी स्कॅम चे काम करण्यास सांगण्यात आले.
सदर काम करण्यास त्यांनी नकार दिला असता त्यांना तेथे सदर काम करणे बाबत त्यांचेवर जबरदस्ती करत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात येवू लागली व सदर मारहाण करतांनाचे व्हिडीओ शेख समीर यांचे घरी पाठवून पैशांची मागणी करण्यात येवू लागली.यावेळी खासदार रवींद्र चव्हाण आ.प्रताप पाटिल चिखलीकर माजी आ.मोहन हंबर्डे यांच्या व पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रयत्नाने शेख समीर घरी पोहोचला.
नोकरीचे आमिष दाखवित शिक्षण घेत असलेले शेख समीर यांना कंबोडिया येथे नेले या नंतर चिंतेत असलेले यांचे नातेवाईक हे मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांना भेटले ...
