Homeकृषीdamage to farmers' crops : टाटा पॉवर सोलारच्या पाण्यामुळे कारला गावातील शेतकऱ्यांच्या...

damage to farmers’ crops : टाटा पॉवर सोलारच्या पाण्यामुळे कारला गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्यावरील व कारला शिवारातील जवळपास दिड ते दोन हजार एकर जमीन खरेदी करून टाटा पॉवर कंपनीकडून या ठिकाणी सोलार पॅनलचा प्रकल्प तयार केला गेला. सदरील जमिनी वर सिमेंट कांक्रेट बांधकाम झाले असल्याने या जमिनीत मुरणारे सर्व पाणी कारला शिवारात जात असुन, पुराचा ओघ वाढत असल्यामुळे दोन दिवसांपासून नाल्यांना पूर वाहू लागला आहे.यामुळे सर्व जमिनी खरडून गेल्या असुन यास टाटा पॉवर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील गेल्या तिन दिवसांपासून अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशा उद्ध्वस्त झाले आहेत.यातच बोरगडी कारला शिवारात टाटा पॉवर कंपनीकडून मोठा सोलार प्रौजेक्ट उभारण्यात आला आहे.या सोलार मध्ये जमिनी दिल्या त्या जमिनीतील पाणी जागेवर मुरत होते. तसेच सर्व कट्टे फोडून जमीन सपाट करण्यात आल्याने पाणी थांबण्यास जागा उरली नाही. तसेच सदरील सोलारच्या ठिकाणी जमिनीवर सिमेंट कांक्रेट बांधकाम केले असल्यामुळे या हजारो एकरातील पाणी कारला गावाकडे वळण घेऊन नाल्यांच्या पुराची पातळी ओलांडली आहे.

IMG 20250819 WA0019 damage to farmers' crops : टाटा पॉवर सोलारच्या पाण्यामुळे कारला गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान

अगोदर पावसाची गती कमी होती परंतु गेल्या दोन वर्षांपासून या सोलार कंपनीच्या शेत जमिनीतील पाण्यामुळे कारला शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन कापूस, सोयाबीन,हाळद,तुर इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या‌बाबतीत शेतकऱ्यांनी टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले होते उन्हाळ्यात नाला सरळीकरण करून बंधारे बांधून देण्यात येणार असल्याचे सांगून काडता पाय घेतला.

त्यामुळे यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आज पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली असुन दोन दिवसांपासून पुराची परिस्थिती जैसे थे अवस्थेत आहे.नाल्यांना पूर वाहू लागला नाल्या काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत.सदरील टाटा पॉवर सोलार कंपनीकडून कारला गावातील नाल्यांची दुरूस्ती करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments