HomeनांदेडCloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती...

Cloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती नुकसान, जनजीवन विस्कळीत

मुखेड/ नांदेड| मुखेड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.

पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या. कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे तब्बल १०० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहेत. शेतातील पिकांसह साठवलेले धान्य, घरगुती साहित्य व जनावरांचे खाद्य देखील वाहून गेले आहे. तर मुक्रमाबाद व लेंडी परिसरातील गुरे,ढोरे, जनावरे मृत्युमुखी पडले आहेत पूर ओसरल्यानंतर हि स्थिती दिसली असून, मुसळधार पावसात रात्री काय परिस्थिती असेल हे विचार करून मन सुन्न होण्याची वेळ पूरग्रस्त भागातील नागरिक शेतकऱ्यावर आली आहे.

IMG 20250818 WA0018 Cloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती नुकसान, जनजीवन विस्कळीत

काही गावांतील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. शाळा, मंदिरे व उंच जागा नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे ठरली. स्थानिक नागरिकांनी “झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी तातडीने मदत जाहीर करावी, शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत” अशी मागणी केली आहे.

IMG 20250818 WA0015 Cloudburst : मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार – शंभर टक्के शेती नुकसान, जनजीवन विस्कळीत

प्रशासनाची धावपळ – आमदारांचा आढावा, एनडीआरएफची टीम दाखल
पूरस्थितीवर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनीही पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी एनडीआरएफची टीम मुखेड तालुक्यात दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments