HomeनांदेडNandede ; गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्ज्वल भविष्य, डॉ.गोविद नांदेडे

Nandede ; गुणवंत विद्यार्थी उद्याचे उज्ज्वल भविष्य, डॉ.गोविद नांदेडे

नवीन नांदेड l गुणवता धारक विध्यार्थी हे ऊद्याचे उज्ज्वल भविष्य असुन ग्रामस्थांनी गावातील मतभेद विसरून एकत्र या,वातावरण टिकवून ठेवा व गावातील ग्रामस्थांनी शिक्षणासाठी पाल्यांसाठी केलेले प्रयत्न हे पुढच्या यशाची पायरी असल्याचे प्रतिपादन पुर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा प्रसंगी केले.

9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य संग्राम सप्ताह अंतर्गत, ग्रामपंचायत कार्यालय टाकळगाव ता.लोहा जिल्हा नांदेड यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही पाचव्या वर्षी दहावी व‌ बारावी मधील विशेष गुणवत्ते मध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थी सोहळा व जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थीनी हिच्या 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता, यावेळी टाकळगाव येथे माजी सेवानिवृत्त पुर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे व सेवानिवृत्त अभियंता जि.एस.गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सन्मान चिन्ह,शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष शंकरराव पाटील मोरे, ऊधोजक माधवराव पाटील शिंदे, ढाकणीकर,ग्रामसेवक अमृतराव शिंदे, डॉ.प्रा.संजय गिरे ,चेअरमन शिवाजी मोरे,दिंगाबर मोगडपले,माजी सरपंच उध्दव पुरी,माजी सरपंच शिवहार पाटील,गोविंदराव मोरे, शंकरराव लामदाडे, पोलीस पाटील प्रतापराव मोरे, ऊपसरपंच संभाजी चितोरे,निवृत्ती चिंतोरे ग्रामपंचायत सदस्य दता देव कांबळे,मुख्याध्यापक कांबळे व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना नांदेडे यांनी शिक्षण शिकण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्वाची असल्याचे सांगून टाकळगाव मधील गुणवंत विद्यार्थी हे भविष्यात निश्चित यशाचे शिखर गाठुन विराजमान होतील असे सांगितले. प्रास्ताविक सरपंच प्रतिनिधी भिमराव लामदाडे यांनी तर सुत्रसंचलन विठ्ठलराव लामदाडे, यांनीतर आभार आनंदराव भोंग यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments