Homeनांदेडअप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

अप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तल्लारी,सेवादास नगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी वृक्षाची रोपे विद्यार्थ्यांना देऊन एक आगळावेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. व पहिली ते पाचवीच्या लहान बालकाच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले.

हा उपक्रम राबवत असताना अप्पारावपेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षाची जोपासना कशी करावी वृक्षाची जोपासना केल्यानंतर पर्यावरणाची संतुलन बिघडणार नाही. जमिनीची धूप होणार नाही. व निसर्गाचा समतोल कायम राहील. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनी पुढाकार घ्यावा. व पर्यावरण अबाधित ठेवावे अशा सूचना दिल्या व झाडे जोपासण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाच्या घरासमोर एक झाड किमान लावून पर्यावरणाचे संतुलन राखावे असे या प्रसंगी आवहाण केले. व झाडे जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसाच्या रूपात शैक्षणिक साहित्य वन विभागाच्या माध्यमातून वाटप करण्यात येईल व त्यांचा प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

IMG 20240615 WA0017 अप्पारावपेठ वन विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रोपे देऊन केले स्वागत -NNL

या कार्यक्रमाप्रसंगी शिवनी येथील वनपाल बि.टी. जाधव, वनरक्षक आर .आर. वनवे, खंडू चिभडे, गणेश सपकाळ विठ्ठल घुले, कुलदीप पाटील ,ज्ञानेश्वर माहूरे, नरसिंग एंगलवार, व शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. अशा स्वरूपाचे नाविन्यपूर्ण उपक्रम तालुका भरात सर्व वन विभागाने राबवावी अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया वनप्रेमी मंडळीकडून ऐकायला मिळत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments