नांदेड| २५वी व २६वी अमरनाथ यात्रा तसेच १७वी व १८वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ रविवार दि.३ २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी, नांदेड येथे महाप्रसाद ठेवण्यात आले आहे. यावेळी अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती उपक्रमातील अन्नदात्यांचा, कृपाछत्र व मायेची उब च्या देणगीदारांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.*

गेल्या २५ वर्षापासून दिलीप ठाकूर हे अमरनाथ यात्रा यशस्वी झाल्यानंतर दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. यावर्षी महाप्रसादाचे आयोजन सौ.जयश्री व धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर,सौ.बिना व राजेशसिंह ठाकुर, सौ.सुनिता व संजय कलकोटे, सौ.वंदना व वैजनाथ फड,सौ.सुषमा व नरसिंह ठाकूर,लक्ष्मी टेंकाळे, शोभा नंदलवार, सुरेखा गादेवार,स्नेहलता जायस्वाल, विमलताई चव्हाण लोहा,जयप्रकाश येवले तसेच एक श्री अमरनाथ यात्री यांनी केले आहे.

दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन जथ्यामध्ये १५७ यात्रेकरूंनी अवघड असलेली अमरनाथ यात्रा पूर्ण केली. राजेशसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ९५ यात्रेकरूंची चारोधाम यात्रा पूर्ण झाली.तिरुपती, कामाख्या देवी( गोहत्ती,आसाम), बैद्यनाथ ज्योतिर्लिंग (देवघर, झारखंड) दर्शन झाल्या प्रित्यर्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.२५ वर्षात शेकडो भाविकांचे माफक दरात तीर्थाटन झाले. दिलीप ठाकूर यांनी विक्रमी तब्बल २६ वेळा अमरनाथचे,३१ वेळा वैष्णोदेवीचे आणि ३० वेळा अमृतसर येथील सुवर्णंमंदिराचे दर्शन घेतले आहे.


पंचविसाव्या अमरनाथ यात्रेमध्ये माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा. डॉ. अजित गोपछडे ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, रेखा भताने, सतीश सुगनचंदजी शर्मा,सुभाष बंग,श्याम हुरणे, ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सरदार जसबीरसिंघ जागीरसिंह अमृतसर, हास्य कवी प्रताप फौंजदार, डॉ. प्रिया त्रिमुखे बेंगलोर ,मनोज शर्मा नागपूर,अमोल गोळे अकोला, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना , भुसावळचे ऍड.निर्मल दायमा व बापू महाजन व संभाजीनगरच्या कृष्णा कदम यांच्या तर्फे एका भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

एका वेळेसच्या अल्पोहाराची सेवा देणाऱ्यामध्ये डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा , कार्यकारी अभियंता द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल, प्रदीप शुक्ला भोपाळ, चंद्रकांत अप्पाराव कदम,अल्ताफ खान मनमाड,पद्माकर केंद्रे,विजया दत्ता खानजोडे, सारिका रविंद्र केंद्रे, डॉ.सुधीर शिवणीकर, अजय संगेवार, कल्पना, संजय कलकोटे, सुभाष देवकत्ते,सुरेश शर्मा ,अनिरुद्ध रामेश्वर वाघमारे,सुनील व्यवहारे यांचा समावेश होता. या अन्नदात्यांमुळे यात्रेकरूंना१४ दिवसाच्या कालावधीत एकदाही जेवण विकत घेण्याची वेळ आली नाही.
वर्षातील ३६५ दिवस अखंडितपणे सुरू असलेल्या भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती उपक्रमामध्ये अनेकजण अन्नदान करतात.कृपाछत्र मध्ये छत्र्या व मायेची उब मध्ये ब्लँकेट साठी आर्थिक सहाय्य करतात. माध्यम प्रतिनिधींनी वेळोवेळी यात्रेची विस्तृत माहिती दिल्यामुळे काळजीत असलेल्या आप्त स्वकीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे अन्नदाते व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी जास्तीत भाविकांनी येऊन महाप्रसादाचे ग्रहण करावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे..

