HomeनांदेडGurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

श्रीक्ष्रेत्र माहूर राज ठाकूर| गुरु पौर्णिमेनिमित्त रविवार दि.१० जुलै रोजी हजारों भाविकांनी श्री दत्तशिखर,श्री देवदेवेश्वर मंदिरात जाऊन श्रीदत्तप्रभुचे दर्शन व प.पु.प.म.मधूसूदनजी भारती महाराज आणि मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

गुरुपौर्णिमे निमित्त दत्त शिखर संस्थानचे प.पु.प. म.मधूसूदनजी भारती महाराज यांचे हस्ते स.७.३० वा.व्यासपूजा पार पडली. त्यानंतर श्रीदत्त प्रभूला अभिषेक व आरती करण्यात आली.यावेळी पूजनीय महंतांनी दत्तशिखर मंदिराभोवती असलेल्या महंतांच्या समाध्यांचे दर्शन घेतले.पुढे मंदिराच्या सभागृहातील परंपरागत गादीवर विराजमान होऊन शिष्य मंडळी व भाविक भक्तांना त्यांनी आशीर्वाद दिला.

IMG 20250710 WA0056 Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

गुरु पौर्णिमेनिमित्त भर पावसात राज्यातील विविध भागातून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह दत्तभक्तांनी मंदिरात,व विविध ठिकाणी असलेल्या मठा (आश्रम) वर प्रचंड गर्दी केली होती.यावेळी ” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ” व प.पु.प.म.मधूसूदनजी भारती महाराज की जय या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.सर्व पूजेचे पुरोहित्य पोथी वाचन विलासराव जोशी रवींद्र जोशी ऋषिकेश जोशी विकास जोशी यांनी केले श्री महंत महाराजांचे वासुदेव भारती, महाराज मुख्य पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. धनराज भारती, हरिहर भारती, चिरंजीव भारती, चिंतामण भारती, वामन भारती, गोवर्धन भारती, लक्ष्मण गिरी, दत्तापुरी, समगीर महाराज, नितेश भारती, माधव गिरी, शिवाजी गिरी, सर्व साधुसंत मंडळी उपस्थित होते.

IMG 20250710 WA0057 Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

महानुभाव पंथीयांचे महास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराचे महंत प.पु.प.म. मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी स. ७ वा.मंदिरात विडा अवसर केला. त्यानंतर मूर्तींना (विशेष ) मंगलस्नान घालून चंदनाचा लेप (उटी )चढ़विण्यात आला.पंथीय संत,महंत,भिक्षुक व वासनीकांसाठी मंदिराच्या भव्य प्रांगणात दु. १ते ५ वाजेपर्यंत प्रसाद (भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा स्पर्श झालेल्या वस्तु ) वंदनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी भगवत गीतेच्या १५ व्या अध्यायाचे समूह स्वरात पठण करण्यात आले.याप्रसंगी पावसाची सारखी रिमझिम सुरु होती.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी पुरेश्या बसेस उपलब्ध न करून दिल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय झाली.भर पावसात भाविकांना पायी चालून मंदिर गाठावे लागले.परिणामी भाविकांचे वाहना अभावी हाल झाले.तर दत्त शिखराच्या पायथा परिसरात दुपारी १.३० वाजता चे दरम्यान ट्रॉफीक जाम होऊन वाहनाची कोंडी झाली होती.पो.नि. गणेश कराड यांनी काही वेळातच सहकाऱ्याच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments