ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने नांदेड भाजपतर्फे मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार – NNL

संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट

नांदेड| भाजप महानगर नांदेड तर्फे अमेरिकेतमध्ये सुरू असलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेट विश्वचषकातले भारताचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर मोफत दाखविण्यात येणार असून, सर्व क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेणाऱ्या हिंदुस्तान विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे रविवार दि.९ जुन रोजी रात्री ७ वाजल्यापासून शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे मोफत दाखवण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी दिली आहे.मोठ्या पडद्यावर सामने दाखविण्याचे हे विक्रमी १६ वे वर्ष असल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा रोमांचकारी सामना होणार आहे. खा. अशोकराव चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात.आतापर्यंत पन्नास षटकांचे ७ वेळा आणि ट्वेंटी- २० विश्वचषकाचे ८ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले.२००७ आणि २०११ मध्ये भारताने एक दिवसीय विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी २० विश्वचषक २००७ मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते.

यावर्षीच्या विश्वचषकात भारतीय संघ जिंकेल असा विश्वास जगभरातील सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे. पहिल्या फेरीचे सामने ९ जून, १२ जून, १५ जून रोजी होणार आहेत. १९ ते ३० जून पर्यंत दुसऱ्या फेरीचे सामने होणार आहेत.त्यामध्ये फक्त हिंदुस्तानचे सामने उमरेकर हाइट्स, शिवाजीनगर नांदेड येथे दाखवण्यात येणार आहेत.आसन व्यवस्था मर्यादित असल्यामुळे सुरुवातीला येणाऱ्यांना प्रथम प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे क्रिडाप्रेमी नागरिकांनी व तरूणांनी वेळेवर येऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲड.दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button