करियरनांदेड

Mla. Hemant Patil : अंध सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींना आमदार निधीतून देणार लॅपटॉप : आ. हेमंत पाटील

नांदेड| बियाँड़ व्हिजन फाउंडेशन संस्थेने समदृष्टी प्रतिष्ठान मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री गोविंदसिंघजी स्टेडिअम नांदेड येथे आज दिव्यांग महिला कला क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना दिल्या. दिव्यांग व्यक्तीचे स्वाभिमानाने जीवन जगण्याचे त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर परिसरातील द्वाटरी दिव्यांगाना सहाय्यक उपकरणे (लॅपटॉप) उपलब्ध करून देण्यासाठी 20 लाख रूपये आर्थिक सहाय्य देणार असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी यावेळी घोषीत केले.

जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधुन क्रीडा संकुल परिसर नांदेड येथे या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या महोत्सवात राज्याच्या विविध भागातून 150 हुन अधिक दृष्टीहीन दिव्यांग महिला सहभागी झाल्या आहेत. महोत्सवाचे स्वरूप अंध मुलींचे प्रदर्शनीय क्रिकेट सामने, राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा, गुणवंत महिलांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन, भेटवस्तुचे वितरण असे आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा समाज कल्याण सतेंद्र आऊलवार, पदाधिकारी सचिन किसने, संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य अपंग शाळा कर्मशाळा सलग्न वसतिगृह अधीक्षक, गृहपाल महासंघ संदिप चोपडे, महासचिव बियाँड व्हिजन फाऊंडेशन सौ मीरा चोपडे, प्रकल्प प्रमुख तथा कोषाध्यक्षा वी. व्ही. गणेश साकळे, समदृष्टी प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश साकले, समदृष्टी प्रतिष्ठानचे सचिव देवेन सोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊ‌लवार यांनीही आयोजनाचे कौतुक केले व शासन आपल्या सोबत आहे असे सांगून. महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधव गोरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार स्वागताध्यक्ष सचिन किसवे यांनी मानले तर सुत्रसंचलन देवेन सोनार यांनी केले.

याप्रसंगी सौ. मिरा चोपडे, शहनाज शेख, नयना पाटणकर या दिव्यांग महिलांचा व गणेश साकळे यांचा राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारत या संस्थेत राष्ट्रीय युवा सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर श्री गोविंदसिंघजी क्रीडांगणावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, सचिन किसवे यांच्या हस्ते मुलीच्या क्रिकेट सामन्याचे नाणेफेक करून उदघाटन करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!