Homeनांदेडhold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे...

hold school in morning session : शाळा सकाळ सत्रात भरवा; इब्टाची जिपकडे मागणी

नांदेड| वाढती उष्णता,जि.प. शाळेत भौतिक सुविधांची कमतरतेमुळे विद्यार्थी,शिक्षक व पालकांना त्रास होत असल्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर यांच्याकडे संघनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.

नांदेड जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, सरचिटणीस निलेश गोधने व संघटना पदाधिकारी यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कमालीची उष्णता वाढ झाली आहे आणि दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत आहे.

शाळांमध्ये अनेक ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव आहे त्यामुळे उस्माघातासारखी समस्या उद्भवू नये म्हणून आपण जिल्हा परिषद शाळा या सकाळच्या सत्राची आठ ते बारा या वेळेत घेण्यात याव्यात अशी विनंती करणारे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे सदर नियोजनाची प्रत प्राथमिक शिक्षणाधिकारी (प्रा.) व (मा.) जिल्हा परिषद नांदेड यांनाही देण्यात आलेली आहे. याबाबत पालक वर्गातूनही सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात याव्यात मागणी केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments