नांदेड l अटल फाउंडेशन देशसेवेच्या निरंतर कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल या उल्लेखनीय कार्याच्या स्वरूपात विशेष कौशल्य यांचे कौतुक करून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र तथा भाजपाचे निष्ठावंत म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध असलेले असे डॉ. अभिषेक रमेशराव सौदे जी यांना 2024 या वर्षाचा अटल गौरव (सन्मान) अवॉर्ड (पुरस्कार) अलंकारिक केलेले प्रशासकीय पत्र मेडल व सन्मान पत्र नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय तीन मूर्ती, नवी दिल्ली येथे आज सन्मान करून गौरविण्यात आले.
याप्रसंगी अटल फाउंडेशन राष्ट्रीयच्या अध्यक्षा सौ.अपर्णा सिंह त्रिपाठी, माजी केंद्रीय मंत्री सत्यनारायण जातीया ,भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजु ,जयपूर खासदार मंजुषा शर्मा जयपूर महापौर सौम्या गुज्जर व अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष गणेश राजे, अटल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोविंद शिंदे, अटल फाउंडेशन नांदेड जिल्हाध्यक्ष गजानन टोकलवाड यावेळी उपस्थित होते.
नांदेड नगरीचे सुपुत्र समाजसेवक, भाजपाचे माजी गटनेते व नगरसेवक, निस्वार्थ देशसेवेत सक्रियपणे राहत अतिशय विपरीत परिस्थितीत नांदेड जिल्हायात गरीब वंचित घटकातील सफाई कर्मचारीच्या घरी जन्म घेऊन आज राष्ट्रीय स्तरावरील फार महत्त्वाचे असे पुरस्कार मिळवणारे नांदेड जिल्हातील पहिलेच राजकारणी आहेत डॉ .अभिषेक रमेशराव सौदे *”अट्टल गौरव*”सन्मान पुरस्कार नवी दिल्ली प्रधानमंत्री संग्रहालय येथे नांदेड नगरीच्या सुपुत्राचा मोठ्या थाटामाटात सन्मान करण्यात आला यावेळी देश विदेशातील मान्यवर उपस्थित होते.