नांदेड| तारासिंह मार्केट येथील शिवांश कम्युनिकेशन यांच्या मार्फत भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक शासकीय योजनांची नाव नोंदणी व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देत अनेकांना मदतीचा हात दिला असून विद्यार्थ्यांसाठीच्या मोफत लॅपटॉप व टॅब योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो विद्यार्थ्यांनी या योजने अंतर्गत फ्रॉम भरून योजनेचा लाभ घेतला असल्याची माहीती शिवांश कम्युनिकेशनचे संचालक विरेंद्रसिंह हजारी यांनी यावेळी दिली.
शिवांश कम्युनिकेशन येथे विद्यार्थ्यांच्या योजनांसह सुक्षिशित बेरोजगार भत्ता ,मोफत स्कुटी योजना , मोफत टॅब योजना, प्रधानमंत्री मोफत सोलार योजना यासह विविध शासकीय योजनांची नोंदणी केलेल्या अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाला आहे तसेच शासनाच्या विविध योजने अंतर्गत अर्ज करायचे आहेत त्यांनी तात्काळ अर्ज भण्यासाठी आमच्या कार्यालयावर भेट दयावी १० वी पास विद्यार्थी व विद्यार्थीनी खुले वर्ग, मागास्वर्गीय तसेच सर्व वर्गातील विद्यार्थी,महीला,युवक तसेच गरजू नागरिक हे या विविध योजनेसाठी अर्ज करू शकतात अशी माहीती त्यांनी दिली.
अर्जासाठी लागणारे कागदपत्रे
१. अर्जदाराचे आधार कार्ड
२. शिक्षणाचा पुरावा (मार्क मेमो)
३. पासपोर्ट फोटो १
४. उत्पनाचे प्रमाणपत्र
५. योजनानिहाय आवश्यक कागदपत्र
शिवांश कम्युनिकेशन यांच्या कार्यामुळे विविध घटकांना मोठा फायदा
शिवांश कम्युनिकेशन चे संचालक श्री विरेंद्रसिंह अशोकसिंह हजारी यांनी निरंतर प्रयत्न करत नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य व गोरगरीब जनतेपर्यंत अनेक शासकीय योजना यशस्वीरीत्या पोहचवून अनेकांना लाभ मिळवुन दिला आहे तसेच त्यांच्या शासन मान्य कार्यालयात आतापर्यंत अनेक फॉर्म भरुन त्यांनी शासनास पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे व त्यांच्या मार्फत अनेक लाभार्थ्यांचा शासना मार्फत पडताळणी पण झालेली आहे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
शिवांश कम्युनिकेशन येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची नोंदणी
केंद्र शासनाच्या मिनीस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्या अंतर्गत मा.प्रधानमंत्री यांनी सर्व सामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या संपूर्ण योजना व महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण योजना येथे उपलब्ध आहेत तरी जास्तीत जास्त गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विरेंद्रसिंह हजारी यांनी केले आहे.