Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL
नांदेड मनोरंजन October 15, 2024

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 15, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे भूषविणार असून, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदी अभिनेत्री मा. प्राजक्ता हनमघर उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे असणार आहेत.

या महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभ दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा. होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे व प्रसिद्ध सिने अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि झी टीव्ही वरील सा रे ग म प विजेते मा. अनिकेत सराफ यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

लोककला, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एकूण ३० कला प्रकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार असून, त्यामध्ये संगीत विभागातील शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्चात्य, कव्वाली इत्यादी, नृत्य विभागांतर्गत लोक नृत्य/ आदिवासी नृत्य, शास्त्रीय नृत्य तर नाट्य विभाग अंतर्गत एकांकिका ,उपरोधिक/ विडंबन अभिनय, मूक अभिनय, नक्कल व वांग्मय विभागांतर्गत वादविवाद, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा तर ललित कला विभागांतर्गत चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, मृदमुर्तीकला, व्यंग्यचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, मेहंदी, इन्स्टॉलेशन इत्यादी कलाप्रकार तर महाराष्ट्राच्या लोककला या विभागांतर्गत पोवाडा, लावणी, लोकवाद्यवृंद व जलसा इत्यादी कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

सदर युवक महोत्सवात ज्या विविध मंचावरून कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे त्या मंचांना १) कै. मारोतराव हंबर्डे मुख्यमंच २) जयवंत दळवी नाट्यमंच ३) प्रभा अत्रे स्वरमंच ४) कविवर्य ना. धों. महानोर विचार मंच आणि ५) सुधा मदन कलामंच अशी नावे देण्यात आलेली आहेत. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील संलग्नित ९९ महाविद्यालयातील जवळपास १५१० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.

‘ज्ञानतीर्थ’ या युवक महोत्सवासाठी शोभा यात्रेकरिता ‘मराठवाड्याची कला व संस्कृती’ हा विषय देण्यात आलेला असून, विष्णुपुरी येथील मारुती मंदिराजवळून ही शोभायात्रा दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० वा. निघणार आहे. वादविवाद स्पर्धेसाठी ‘महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी वर्तमान कायदे पुरेसे सक्षम आहेत/नाहीत’ हा विषय दिला आहे. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी १) भारतीय संविधान: जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, २) जाणावया वेदना, जागवू संवेदना, ३) असाध्य ते साध्य करिता सायास, ४) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० :संधी व आव्हाने हे विषय देण्यात आलेले आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा त्या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवातील शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर यांनी केले आहे. सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या युवक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ आणि आयोजक महाविद्यालयाकडून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून युवक महोत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

'Dnantirtha-2024' Youth Festival 18th and 21st October It will be held between
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCelebrating World Hand Washing Day : जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा; हात धुवा प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे धडे -NNL
Next Article Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL

June 28, 2024

diagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार

July 21, 2025

Thousands of devotees will come for darshan on Shravan Monday : वाढोण्यात पहिल्या श्रावण सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येणार – NNL

August 4, 2024

DRM Pradeep Kamle’s surprise inspection : हिमायतनगर रेल्वे स्थानकावर डीआरएम प्रदीप कामले यांची अचानक पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर

October 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

Gammat Hote Nyathchi : “गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली -NNL

Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

Marketing Minister Jayakumar Rawal : गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार – पणन मंत्री जयकुमार रावल

Commits Suicide : चिंचगव्हान येथे विवाहित प्रेमीयुगुलांची विष प्राशन करून दुर्दैवी आत्महत्या

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?