HomeनांदेडGanapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या...म्हणत...

Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

लोहा| गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत मोठ्या उत्साही वातावरणात डीजेचा आवाज न करता लोहा शहर व तालुक्यातील गणेश मंडळाने मिरवणूक काढत श्रीचे विसर्जन केले.बालगोपाल तसेच तरुणाई ढोल ताशावर थिरकली.

शहरात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या वतीने युवा नेते दीपक कानवटे यांनी खिचडी वाटप केली. तर जुन्या शहरातील प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणरायाच्या प्रतिमेची शेवटची आरती माजी आ रोहिदास चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली.तहसीलदार परळीकर, डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यासह पालिका प्रशासन, विद्युत मंडळ पोलीस यंत्रणा यांनी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रयत्न केले.

शहरात गणेशोत्सव काळात कोणतेही कार्यक्रम गेल्या आठ दहा वर्षां पासून होत नाहीत तीच परंपरा यंदाही होती. शहरात ३७मंडळ होते त्यात २६ गणेश मंडळ अधिकृत मान्यता घेतलेले होते. हद्दीत एकूण ६८ मंडळ होते १०५ गणेश मंडळाची नोंद होती त्याचे विसर्जन शांततेत पार पडले शहरातील गणेश विसर्जन सुनेगाव तलावात ते ग्रामीण भागात त्या त्या गावात परंपरागत पद्धतीने झाले. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर व टीमने दहा दिवस घेतलेली मेहनती मुळे यंदा जुगार, पते यावर आळा बसलेला दिसला सकाळ पासूनच गणेश मंडळा ने आपल्या सोयीनुसार गणेश विसर्जन केले.

IMG 20240917 WA0221 Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या...म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

तहसीलदार परळीकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री स्वामी यासह नगर पालिका व पोलिसांनी विसर्जन शांततेत पार पडावे म्हणून काळजी घेतली. जुन्या शहरात माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध गणपती रायची आरती केली केशवराव मुकदम ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी याच्या गल्लीतील गणेशमूर्ती सर्वात मोठी व उंच होती. त्या मिरवणुकीत मोठी गर्दी झाली होती सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन वेळेत पार पडले.

चिखलीकरानी केला गणेश मंडळाचा सत्कार

IMG 20240918 122804 Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या...म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL
लोहा शहरातील गणेश विसर्जन काळात मंडळाच्या अध्यक्षा चा माजी खा प्रतापराव पाटील यांच्या वतीने याहीवर्षी सत्कार करण्यात आला. दीपक पाटील कानवटे याच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. उद्घाटन युवानेते सचिन पाटील चिखलीकर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,पोलीस निरीक्षक चिंचोलकर ,केशवराव मुकदम माजी सभापती आनंदराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, छत्रपती धुतमल, भास्कर पाटील पवार , हरिभाऊ चव्हाण दिनेश तेलालवर नारायण येलरवाड ,मिलिंद पाटील पवार , नरेंद्र गायकवाड, सचिन मुकदम , बाळु पाटील बाबर सूर्यकांत पाटील गायकवाड, अविनाश पाटील पवार ,भारत पाटील कदम ,व्यंकट जंगले, बाळू पाटील पवार ,संदीप जाधव संग्राम पाटील जाधव संदीप पवार मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments