नवीन नांदेड| नवीन कौठा भागात सुरू असलेल्या प्रदिप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून शिव पुराणकथेचा पहिल्या दिवशी कथा संपल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने मंडपात चोहोबाजूंनी साचलेल्या पाण्याचा प्रवाह तात्काळ मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांनी तात्काळ मनपा बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे व कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांनी सात ते आठ जेसीबी साहायाने चारही बाजुने मोठ्या प्रमाणात नाली खोदून पाण्याचा प्रवाह बाहेर काढला तर स्वच्छता विभाग साफ सफाई महिला पुरुष कर्मचारी यांच्या सह मनपा प्रशासनाने साफ सफाई करून पाण्याचा निपटारा व चिखल भागातून अनेक भाविक भक्तांची सुटका केली.
२३ ते २९ आगस्ट दरम्यान नवीन नांदेड भागातील मोदी मैदान येथे शिव पुराण कथेचे आयोजन दि. २३ आगस्ट पासून करण्यात आले होते. पहिल्या दिवशी १ ते ४ कथा संपल्यानंतर अचानक मुसळधार पाऊस आगमन झाले व कथास्थळी भाविक भक्तांची मोठया प्रमाणात धावपळ सुरू झाली, अखेर पंधरा मिनिटात मनपाचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु, मनपा बांधकाम कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे,सहाय्यक अभियंता किरण सुर्यवंशी, यांच्या सह स्वच्छता विभाग सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, विभाग प्रमुख वशिम तडवी ,सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कासस्टेवाड, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,यांनी तात्काळ कथास्थळी धाव घेऊन मनपा स्वच्छता विभाग, महिला पुरूष कर्मचारी यांच्या सह अनेक विभाग प्रमुख यांनी कथास्थळी असलेल्या पाण्याचा निपटारा व भाविक भक्तांची मोठया प्रमाणात असलेली गर्दी ईतर ठिकाणी खाजगी बस व महामंडळाच्या बसेस ने इतरत्र हालवली व मंडप खाली करून साचलेल्या पाण्याचा निपटारा करण्यासाठी परिश्रम घेतले, बांधकाम विभाग यांच्या तत्परतेने सात जेसीबी साह्याने चारही बाजूंनी नाला खोदून जमा झालेला पाण्याचा प्रवाह बाहेर काढून भाविक भक्तांना दिलासा दिला. मनपाच्या तात्काळ दखल घेऊन केलेल्या या कार्यवाही मुळे अनेक भाविक भक्तांना दिलासा मिळाला.