Wednesday, May 13

Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL

नवीन नांदेड़ | नांदेड तालुक्यातील ,मौजे भायेगाव ता. जि. नांदेड येथील शेती ई पीक पहाणी करुन सुध्दा यादीत नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ईपिक पहाणी करण्याची मागणी भायेगाव सरपंच सौ.सविता बालाजी खोसडे यांनी नांदेड नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात २३ आगस्ट २३ या दिवशी ई पीक पहाणी केलेले आमच्याकडे फोटो प्रत असून सुध्दा वरील प्रमाणे पीकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषीत करत आहे. पुर्ण ई पीक पहाणी झाल्यानंतर पीकाची माहिती साठविली असून ती अपलोड सुध्दा झालेली आहे.

इतके करुन सुध्दा आमच्या शेतातील ई पीकाची पेरा हा ७/१२ उत्ताऱ्यावर आजपावेतो आलेला नसून त्याचे ई पीक पहाणीच्या यादीमध्ये भायेगाव गावातील काही शेतकऱ्यांचे नाव सुध्दा ई पीक पहाणीच्या यादीमध्ये आमचे नाव आलेले नाही. सोयाबीन अनुदानासाठी आमची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी,अशी मागणी सरपंच सौ सविता बालाजी खोसडे व उपसरपंच बालाजी कोल्हे व समस्त भायेगाव ग्रामस्थ यानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!