Blogनांदेड

Balaji Kalyankar ; फरांदे पार्क मधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून वीस लाखापेक्षा जास्त निधी – NNL

नांदेड। एप्रिल 2023 फरांदे पार्कच्या नागरिकांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मंदिरासमोरील पेव्हर ब्लॉकसाठी निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी 15 लाख निधी देखील जाहीर केला होता त्या कामाचे उद्घाटन आज रक्षाबंधन तसेच तिसरा श्रावण सोमवार निमित्त फरांदे पार्कच्या मंदिरात भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले

या कार्यक्रमाला मा.आमदार बालाजी कल्याणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेशभाऊ पावडे, नितीन सावते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बदुरे, गुत्तेदार धनंजय पावडे तसेच फरांदे पार्कमधील प्रा.राम जाधव, श्री. जयराम वडजे श्री.वसंत कऱ्हाळे, श्री.राजेंद्र शंकरपुरे, डॉ. श्रीराम श्रीरामे, डॉ. सुजित येवलीकर, डॉ.भारती मढवई,श्री सुनील देशमुख, सौ.अश्विनी मैराळ श्री गंधेवार, श्री ठाकूर साहेब, श्री.सुदाम चव्हाण, श्री.सचिन घुगे, श्री.टी.पी शिंदे, श्री.दयानंद माने, श्री प्रसाद माने, श्री.साहेबराव वाटेगावकर, श्री.दत्तू रायपल्ले, श्री बाबुराव भाकरे, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुजित येवलीकर, प्रस्तावना प्राध्यापक डॉ. राम जाधव सर तर आभार प्रदर्शन डॉ भारती मढवई-येवलीकर यांनी केले. कार्यक्रम पार पडण्यासाठी फरांदे पार्क मंदिर समिती तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुण युवक मंडळाने परिश्रम घेतले.
आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीमुळे फरांदे पार्क परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
सर्वत्र आमदार साहेबांचे कौतुक होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button