Homeनांदेडtaluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा...

taluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा संघ प्रथम -NNL

हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून, संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

हिमस्यातनगर शहरात नुकत्याच तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा संपन्न झाल्या. या स्पर्धेत हुतात्मा जयवंतराव प्रशालेतील क्रीडा संघाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. झालेल्या या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य रणखांब जी.एम. यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातून माझ्या शाळेतून मोठा खेळाडू तयार झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अश्या शब्दात प्राचार्य रणखांब सर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी संघाला मार्गदर्शन करणारे शिक्षक तथा कोच मनोज जन्नावार सर व सुनिल सुवर्णकार सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे देखील अभिनंदन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments