नांदेडसोशल वर्क

सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृक्षभेट देऊन कविंचा सन्मान ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी -NNL

नांदेड| येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने वृक्षभेट देऊन साहित्य चळवळीतील कविंचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने मंडळाचे कविसंमेलन संपन्न झाले. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, ज्येष्ठ कवी थोरात बंधू, आंबेडकरी कवी मुक्तीघोष सुर्यंकर, पत्रकार कुलदीप सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरमहा काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. काव्यपौर्णिमा मालेतील जुलै २०२४ महिन्याची ८५ वी काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी झाली.

यात अनुरत्न वाघमारे, पांडुरंग कोकुलवार, प्रज्ञाधर ढवळे, शरदचंद्र हयातनगरकर, थोरात बंधू, रणजित गोणारकर यांनी सहभाग नोंदविला तर आॅनलाईन पद्धतीने सटवाजी माचनवार, बाबुराव पाईकराव, जीवन मांजरमकर, उषाताई ठाकूर, प्रल्हाद घोरबांड, काशिनाथ महाजन आदींनी सहभाग घेतला. काव्य पौर्णिमा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!