Friday, May 15

Tag: Women of self-help groups decided to vote…

बचत गटांच्या महिलांनी केला मतदानाचा निर्धार – NNL

बचत गटांच्या महिलांनी केला मतदानाचा निर्धार – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l सिडको परिसरातील रुबी हॉटेल या ठिकाणी 28ऑक्टोबर रोजी महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मतदान जनजागृतीच्या संदर्भात 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्ष मार्फत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत असताना स्वीप कक्षातील जेष्ठ सदस्य व महिला बचत गट विषयक अभ्यासाचे तज्ञ प्रा.डाॅ. घनश्याम येळणे, संचालक सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटातील महिलांनी असा निर्धार केला की, येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह मतदान करण्याकरिता निर्धार करीत आहेत. याप्रसंगी बोलत असताना प्रा.डॉ येळणे असे म्हणाले की, 'भारतासारख्या मोठ्या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये महिलांचा राजकीय सहभाग हा मतदानाच्या माध्यमातून असणे हे आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.' ...
error: Content is protected !!