Sanjay Rathod : शेतकऱ्यांना जास्तीतजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा अतिवृष्टीग्रस्त पाऊस होऊन शेती, रस्ते, पुल यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची जास्तीतजास्त मदत शेतकऱ्यांना त्वरीत मिळून देणार असल्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात हदगाव, अर्धापूर, नांदेड, लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन मंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे अश्वस्त केले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर, आमदार आनंद पाटील बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील धानोरा, अर्धापूर तालुक्यातील चिंचबन, नांदेड तालुक्यातील नांदुसा, लोहा तालुक्या...
