Friday, May 15

Tag: Was there an attempt

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

नांदेड, क्राईम
नांदेड/भोकर | विज्ञानाच्या युगात देश प्रगतीच्या वाटेवर असताना, समाजात आजही अंधश्रद्धेचे भयावह रूप कायम असल्याचे पुन्हा एकदा भोकर तालुक्यात उघडकीस आले आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका तरुणाला नरबळीच्या दिशेने ढकलण्याचा धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यातील बल्लाळ शिवारात समोर आला असून, या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बल्लाळ येथील एका शेतात गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून हा थरारक प्रकार घडला. मंगळवारी (दि. ४) रात्री आरोपींनी श्रीकांत बाजेकर या तरुणाला शेतात नेले. तेथे त्याला बळजबरीने कपडे काढायला लावून गळ्यात लिंबाची माळ घालण्यात आली. त्यानंतर लिंबू, मिरची, हळद, कुंकू, नारळ आदी साहित्य वापरून त्याच्याकडून तथाकथित अघोरी पूजा करून घेण्यात आली. या अमानुष प्रकारामुळे श्रीकांत प्रचंड घाबरून गेला होता. दरम्यान, या घटनेची चर्चा गावात पसरताच त्याचा भाऊ सिद्धांत शेषेराव बाजेकर यांनी ...
error: Content is protected !!