Bullockpola festival is a big celebration : हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या साजरा; ढोल ताशाच्या गजरात काढली मानाच्या बैलजोडीची मिरवणूक -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत असताना दोन दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हिमायतनगर शहरात बैलपोळा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. यावेळी भर पावसात वाजत गाजत नगरपंचायतीच्या मनाच्या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली होती. हर हर महादेवच्या नामाचा जयघोष करून विवाहसोहळा थाटात सपन्न झाला.
कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येपासून पोळ्याची तयारी केली जाते. येथील युवा शेतकरी जंगल परिसर पिंजून काढून पळसाच्या पानाचा देठवा आणून अन्नदात्या सर्जाराजाची खांदे मळणी करतात. आणि बळीराजाला पोळ्याच्या दिवशीचे जेवणाचे निमंत्रण दिले आहे. शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या (ऋषभराजाचा) ब...
