Friday, June 26

Tag: was seriously injured

Monkey Attach : शिवणीत माकडांच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिला गंभीर जखमी

Monkey Attach : शिवणीत माकडांच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिला गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट /शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या शिवणी गावात माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, माकडांच्या हल्ल्यात चंद्रकलाबाई गंगाधर कट्टलवाड (वय ६०, रा. शिवणी) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असून या घटनेमुळे गावात महिला-पुरुषांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवणी गावात गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उपद्रव वाढत असून, याआधीही महिला, पुरुष व लहान मुलांवर माकडांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चंद्रकलाबाई कट्टलवाड या महिलेच्या गंभीर जखमी होण्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिला व लहान मुलांमध्ये भीती गावातील मुख्य रस्ते, वस्ती परिसर, आठवडी बाजार तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसरात माकडांचे टोळके मुक्तपणे वावरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला ...
error: Content is protected !!