Monday, May 25

Tag: under the Chief Minister’s Prosperous Village Panchayat campaign

Tembhi Grampanchayat : मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत टेंभी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी

Tembhi Grampanchayat : मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत टेंभी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माळोदे यांनी हिमायतनगर तालुक्यातील टेंभी ग्रामपंचायतीला भेट देऊन सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. गावातील अंतर्गत रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्ड्यांची उभारणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था यासह इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. विशेषतः गावामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व्यवस्थेचे श्री. माळोदे यांनी तोंडभरून कौतुक केले. ग्रामपंचायतीने केलेले नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज हे इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त...
error: Content is protected !!