Workers Protest march ; हजारो बांधकाम व घरेलू कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
नांदेड। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे नोंदीत आणि जीवित कामगार आपल्या न्याय हक्क आणि अधिकारापासून वंचीत असल्यामुळे १२ जून रोजी दुपारी १२ वाजता हजारोच्या संख्येने मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मोर्चास सुरवात झाली.
मोर्चाचे नेतृत्व सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांनी संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु समाधान झाले नसल्याने मोर्चा काढण्यात आला.
इमारत बांधकाम कामगार व घरेलू तसेच असंघटित कामगारांना कल्याणकारी मंडळा मार्फत अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतात. त्यामध्ये नोंदीत कामगारां...
