Mahur Navratri Festival : उदे ग अंबे उदे च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ
माहूर/नांदेड| महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता मातृतिर्थ तलावातील पवित्र जल आणून देवीचा अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पारंपरिक विधीवत घटस्थापना संपन्न झाली.
घटस्थापनेच्या वेळी "उदे ग अंबे उदे" च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व महाआरती केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा संपन्न झाली.
देवीला पिवळ्या पैठणी वस्त्र अलंकार अर्पण करून साजशृंगार करण्यात आला. घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढून परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती तसेच कुमारिका ...
