Friday, June 26

Tag: the soldiers who are continuing tirelessly…Nandedkar was mesmerized by the wonderful response from the audience to the program

अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा छान प्रतिसाद, मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध

अव्याहत सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी…कार्यक्रमास रसिकांचा छान प्रतिसाद, मान्यवरांची हजेरी आणि देशभक्तीच्या विविध रचना व नृत्याने नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड, मनोरंजन
नांदेड l राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांप्रती असलेल्या आदरपूर्वक भावना याचा संगम म्हणजेच २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेली १८ वर्ष सादर होत असलेला सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रम काल कुसूम सभागृहात उत्तरोत्तर रंगला.देशभक्तीपर विविध रचना व नृत्य सादर करुन महाराष्ट्रातील विविध कलावंतांनी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन देशभक्तीची भावना वृध्दींगत केली. नांदेड जिल्हा पोलीस दल आणि संवाद यांच्या वतीने पत्रकार विजय जोशी यांच्या पुढाकरातून गेल्या १७ वर्षापासून सुरु असलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गितांचा ५८ वा प्रयोग नांदेडच्या कुसूम सभागृहात काल सायंकाळी पार पडला. दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तर उद्घाटक म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे उपस्थित होते. तर प्रम...
error: Content is protected !!