Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल
हदगांव l शहरातील बांधकाम कामगाराचे नविन ऑन लाईन व नुतनीकरण बांधकाम कामगाराच्या पात्र नोंदणी अर्जाला कोणती त्रुटी नसताना सुध्दा संबंधित बांधकाम कामगार मंडळा कडुन जाणुन बुजून त्रुटीमध्ये टाकत असल्याने दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे.
बांधकाम कामगाराचे अर्ज वारंवार त्रुटीत काढल्याने तो अर्ज पुन्हा ऑन लाईन करुन दुस-या तारखेला हजर राहण्यासाठी कामगाराचे रोजगार बुडत आहे. व ऑन लाईन पुन्हा करण्यासाठी कामगारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बांधकाम कामगाराचे संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणतीही त्रुटी नसताना पात्र बांधकाम कामगाराच्या अर्जात जाणुन बुजून त्रुटीत काढत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या सर्व शासकिय योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. व तसेच कामगाराचे अर्ज पात्र होत नसल्याने त्यांना सुरक्षा सं...
