आठवडी बाजाराच्या दिवशी कृषी मंडळ अधिकारी कार्यालय बंद शेतकऱ्याचा कार्यालय समोर ठिया -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील गजबजलेली व्यापार पेठ म्हणून इस्लापूर येथील व्यापारपेठस संबोधले जाते त्यातच या व्यापारपेठेशी सलग्नित 45 खेडेगावाचा संपर्क असून या 45 गावातील शेतकऱ्यांचा कार्यभार कृषी मंडळ अधिकारी कार्यालय इस्लापूर येथील कार्यालयांतर्गत चालतो. दिनांक 28 रोजी शुक्रवार हा आठवडी बाजारपेठेचा दिवस असताना येथील कृषी कार्यालय व तलाठी कार्यालय सुद्धा बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याची विदारक दृश्य पहावयास मिळाले. त्यातच इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुप देशमुख यांनी कृषी कार्यालयातील कर्मचारी व तलाठी सज्जा वरील कर्मचारी ही कार्यालयात दैनंदिनरीत्या हजर राहत नसल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली.
विशेषतः आठवड्याचा पहिला दिवस आज सोमवार असताना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांची जयंती असताना सुद्धा कृषी कार्यालय बंद अवस्थेत प...
