Friday, June 26

Tag: the national campaign “Healthy Women

Healthy Women : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ

Healthy Women : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेश राज्यातील धार येथून आज करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे दाखविण्यात आले. या निमित्ताने नांदेड जिल्हास्तरावरील “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे पार पडले. महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व टिमने “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार,...
error: Content is protected !!