addiction-free life ; दहा हजार विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ
नांदेड l डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण प्रसारक मंडळ, जांब (बु) या संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वर्षभरात सुमारे १०,००० विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ दिली गेली. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले गेले आणि त्यांना