Thursday, May 14

Tag: Take action against the racket in Mahur Kinwat taluka that is smuggling ration…

Mahur Smuggling of rations ; रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

Mahur Smuggling of rations ; रेशनमालाची तस्करी करणा-या माहूर किनवट तालुक्यातील रॅकेटवर कारवाई करा…

क्राईम, नांदेड
माहूर l रेशनमालाची तस्करी करणा-या इसमांकडून पत्रकारास जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभुमिवर किनवट व माहूर तालुक्यातील रेशनमालाची तस्करी करणा-या रॅकेटवर कारवाई करून जीवनावश्यक वस्तू काळाबाजार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी अ. भा. म. पत्रकार संघाकडून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एकीकडे शासन गोरगरीबांसाठी मोफत राशन देत असताना जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिण्यांचे रेशन लाभार्थ्यांना चालू महिण्यात वाटप होत आहे. याच संधीचा फायदा घेत काल दि. २२ रोजी बाई बाजार येथे रेशन दुकानाच्या बाजूला उभे राहून एक इसम गरीब लाभार्थ्यांकडून गहु व तांदळ खरेदी करीत असल्याचे वास्तव येथील पत्रकार बाबाराव कंधारे यांच्या लक्षात आले. त्यावेळी रेशनमाल तस्करीसाठी खरेदी करीत असलेल्या इसमासह त्या वाहनाचे छायाचित्र घेतल्या नंतर तस्कराने कंधारे यांना हातपाय तोडुन जिवे मारण्याची धमकी दिली होती...
error: Content is protected !!