Sunday, June 28

Tag: Significant increase in the prize money

Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

Mla prataprao patil chikhalikar : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन, कुस्त्या व शंकरपट स्पर्धांच्या बक्षिसांत भरीव वाढ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/लोहा/माळाकोळी | दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव वाढविण्यासाठी यंदा कुस्ती, कृषी व पशुप्रदर्शन तसेच शंकरपट स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात आला असून, कला परंपरेचे जतन व्हावे यासाठी कला महोत्सवातील कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. माळेगाव येथे आमदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, तमाशा व लोकनाट्य मंडळांची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याने त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा व प्रोत्साहनपर मानधन दिले जावे. यात्रेत सर्वपक्षीय नेत्यांचा सन्मान व्हावा, तसेच सुविधा पुरविताना कोणतीही उणीव राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी...
error: Content is protected !!