Saturday, June 27

Tag: Shiv Mahapuran story begins in a devotional atmosphere at Thursday Bazaar

CIDCO ; गुरुवार बाजार, सिडको येथे शिवमहापुराण कथेला भक्तीमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ

CIDCO ; गुरुवार बाजार, सिडको येथे शिवमहापुराण कथेला भक्तीमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड | गुरुकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळ्याला दि. २२ जानेवारी रोजी गुरुवार बाजार, सिडको येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. हा धार्मिक सोहळा दि. २८ जानेवारीपर्यंत चालणार असून दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत शिवमहापुराण कथा व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवमहापुराण कथेस भागवताचार्य ह.भ.प. श्री. अनिल महाराज (माजलगांवकर) आपल्या सुमधुर वाणीने कथा सांगत असून त्यांच्या प्रवचनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सिंथ वादक भाऊराव कनकापुरे व तबला वादक श्रीपाद गोनाकुडतेवार यांच्या सुरेल साथीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. दररोजच्या शिवमहापुराण कथेमध्ये विविध धार्मिक देखावे, छाकी, अवतारांचे सादरीकरण, भगवान शंकर–पार्वती विवाह सोहळा, श्रीकृष्ण दर्शन अवतार आदी प्रसं...
error: Content is protected !!