Municipal corporation; महापालिके समोर सीटूच्या साखळी उपोषणात शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी
नांदेड l भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती डीवायएफआय युवक संघटना आणि सीटूच्या वतीने रविवारी महापालिके समोर साजरी करण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे तरुण क्रांतिकारक म्हणून त्यांची ख्याती जगभर आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सीटू च्या वतीने २२ सप्टेंबर पासून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिके समोर सीटू संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरु असून मागील वर्षी २११५ पूरग्रस्तांची अंतिम यादी व पंचनामे मनपाने तहसीलदार यांना सादर केले असून अद्याप पैसे वर्ग झाले नसल्याने उपोषणास सुरवात केली आहे.
तसेच संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील पूरग्रस्तांची यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महापालिका आयुक्त आणि तहसीलदार नांदेड यांना देण्यात आली असून त्या यादीतील पूरग्रस्तांच्या घराची गृहपाहणी करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावेत या आणि इतर माग...
