साबांवि.अधिकारी व खाजगी गुत्तेदार यांनी संगनमताने प्रस्तावित कामे केलेली हाणून पाडणार- सरपंच दत्ता जाधव -NNL
नांदेड| नांदेड तालुक्यातील मौ वांगी येथे पुनर्वसन अंतर्गत मूलभूत सोयी सुविधेची कामे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव यांनी वेळो वेळी पाठपुरावा करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत जिल्हा प्रशासनाला सूचना करून गावातील सर्व मूलभूत सोयी सुविधा यांचा अहवाल तयार केला. जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन सर्व सहकार्य करून घेऊन गावात जाय मोक्यावर जाऊन अहवाल करून सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथे अहवाल दाखल केला असून संगनमताने प्रास्तावित केलेल्या कामा बाबत ऊप जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात, वांगी येथील पुनर्वसन बाबत अहवाल महसूल मंत्री यांनी जिल्हाध्यक्षांची दखल घेऊन मंजुरी देण्यास शिफारस केली असता पु...
