Saturday, June 27

Tag: Rotary Club Nanded’s initiative

Rotary Club : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरी क्लब नांदेडचा पुढाकार

Rotary Club : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रोटरी क्लब नांदेडचा पुढाकार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अचानक आलेल्या महापुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हसनाळ, रावणगाव व भेंडेगाव या गावांना मोठा फटका बसला. घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले, शेतातील उभे पीक नष्ट झाले, पशुधनाचेही नुकसान झाले. यामुळे गावकर्‍यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. या कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब नांदेड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला. क्लबच्या वतीने गावातील शेकडो नागरिकांना तांदूळ, डाळ, पीठ, तेल, बिस्किटे, ब्लँकेट, कपडे यांसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदतकार्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मितेश मालीवाल, सचिव डॉ. बी. आर. मालू, उमेश गरुडकर, रेखा गरुडकर, कैलास काला, बंग, सुभाष मामीडवार, भारतीया, शिंदे, कमटलवार, भोसीकर, आणि मुखेड रोटरी क्लबचे डोईबोळे हे मान्यवर विशेष उपस्थित होते. सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष ...
error: Content is protected !!