Gharkul ; मुख्याधिकारी लाळगे यांचे निर्देश ; लोह्यात “घरकुल “बांधकाम सुरू न करणाऱ्या ८०० लाभार्थ्यांना नोटीस “५ मार्च पर्यंत मुद्दत
लोहा l अधिकारी सक्षम व गतिमान पारदर्शी प्रशासन चालविणारा असेल तर कार्यलयातील मरगळ -आळस आपोआप गळून पडते .लोहा नगर पालिकेत गेल्या दीड महिण्या पासून मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्यामुळे असेच चित्र दिसते आहे..गेल्या आठ वर्षा पासून प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेला गती आली असून पंधरा दिवसा पासून संबीधित विभागात रात्री उशिरापर्यंत प्रलंबित फाईल पूर्ण करत आहेत.पीएम आवास योजनेचे जवळपास आठशे लाभार्थ्यांनी घरकुल बांधकाम सुरूच केले नाही त्यांना मुख्याधिकारी श्री लाळगे यांनी नोटीस बाजवल्या असून ५ मार्च पर्यंत बांधकाम सुरू करावे अन्यथा लाभार्थी यादीतील नाव रद्द करू असे कळविले आहे
लोहा नगर पालिकेत पंतप्रधान आवास योजनेत पहिल्या टप्यात २०१८ मध्ये ७४६, दुसऱ्या टप्प्यात ९५०तर तिसऱ्या टप्प्यात २९६ असे एकूण १ हजार ९९२ घरकुल मंजूर झाले पण गेल्या आठ वर्षा पासून ही योजना रखडत रखडत सुरू आहे आमदार प्रतापराव पा...
