Saturday, June 27

Tag: Poor quality work

Poor quality work : सिरंजनी–पळसपूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ; गुणवत्तेचा अभाव

Poor quality work : सिरंजनी–पळसपूर रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम ; गुणवत्तेचा अभाव

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (प्रतिनिधी) सिरंजनी ते पळसपूर या मार्गावरील सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याचे उद्‌घाटन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते झाले होते. ग्रामीण भागातील हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून, नांदेड जिल्हा परिषद बांधकाम विभाग (भोकर) अंतर्गत लाखो रुपयांचा निधी मंजूर करून मागील सहा महिन्यांपूर्वी या कामास सुरुवात झाली होती. मात्र प्रत्यक्ष कामाची गती अतिशय मंद असून, सदरचे काम अंदाजपत्रकाला बगल देऊन दर्जाहीन होत आहे. सिरंजनी नजीक सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात टोळ दगड टाकून वरवर सिमेंट काँक्रेट ओतले जात असल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे खडीकरण मजबुती न करता ठेकेदाराने काम थातुरमातुर पद्धतीने केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी केला आहे. एव्हढेच नाहीतर रस्त्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर निधीचा जाणिवर्वक उल्लेख न क...
error: Content is protected !!