Grampanchayat News : ग्रामपंचायतांवर प्रशासक नेमणुकीस विरोध; हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
हिमायतनगर (अनिल मादसवार) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ग्रामपंचायतांवर लोकनियुक्त प्रतिनिधींची गरज अधोरेखित करत प्रशासक पद्धत लोकशाहीविरोधी असल्याचा ठाम सूर मांडण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायती या ग्रामीण लोकशाहीचा कणा असून, लोकनियुक्त सरपंच व सदस्यांमार्फतच विकासकामे प्रभावीपणे राबवली जातात. मात्र प्रशासक नेमल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व कमी होऊन ग्रामविकास प्रक्रियेला खीळ बसेल. प्रशासकांना स्थानिक प्रश्नांची पुरेशी जाण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात, असेही नमूद करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरपंच संघटनेने स्पष्ट केले की, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास लोकप्रतिनिध...
