A gold-plated wall : इतिहासाच्या भिंतीवर फुलांचा सुवास… पाटणूर ‘आपरंपार’ गडावर सोनचाफ्याची भिंत!
नांदेड| इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या पाटणूरच्या ‘आपरंपार’ महाराज गडावर आता निसर्गाची सुवासिक सजावट घडत आहे. गडाच्या दोन्ही बाजूने तब्बल दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या झाडांची भिंत उभारण्यात आली असून, या फुलांच्या दरवळाने गडाभोवतालचे वातावरण अधिक पवित्र, निसर्गसुंदर आणि भावस्पर्शी बनणार आहे. यातून पाटणूरच्या सत्याग्रही जंगलात आता सुगंधी अनुभूती मिळणार आहे.
हा अनोखा उपक्रम ‘आपरंपार गड संस्थान पाटणूर’ यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला असून, यावेळी पुढील पाच वर्षांसाठी गडाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी यांच्या सहकार्यातून सोनचाफा वृक्षसंवर्धन उपक्रम मार्गी लागला. गावातील तरुणांच्या संकल्पनेतून आणि ‘सेवा समर्पण परिवार’ या संस्थेच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. सेवा समर्पणचे मान्यवर पदाधिकारी सकाळी ६ वाजता गडावर उपस्थि...
