Sunday, May 31

Tag: of the full-length statue

Hunger strike : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र

Hunger strike : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेसाठी उपोषण तीव्र

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुन्नाभाऊ शिंदे व बालाजी ढोणे यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले. बुधवारी उपोषणस्थळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सरोजताई देशमुख यांनी भेट देत आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी दिनेश रावते, राम पतंगे, विलास वानखेडे, उदय देशपांडे यांच्यासह मराठा व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाल्या, “महाराजांची जयंती असल्याने आम्ही संयम बाळगला आहे; मात्र तात्काळ जागा निश्चित न झाल्यास उपोषणाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करावे लागेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहील.” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. प्रशासनाने केवळ...
error: Content is protected !!