Guru Teg Bahadur Sahib ji : श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत समागम
नांदेड| गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने “हिंद की चादर” श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या ३५० व्या शहादत (बलिदान) समागम निमित्त दिनांक २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे विविध धार्मिक, सामाजिक व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन आदरणीय पंज प्यारे साहिबान यांच्या सरप्रस्तीखाली व गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे मा. प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह जी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
विशेष कीर्तन दरबार: २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तख्त सचखंड साहिबच्या दरबार साहिब परिसरात दररोज सकाळी व संध्याकाळी कीर्तन दरबार भरविण्यात येणार आहे. यात पंथप्रसिद्ध रागी जत्थे, कथाकार व प्रवचनकार सहभागी होऊन श्री गुरु तेग बहादर साहिब जी यांच्या जीवन व बलिदानावर आधारित कीर्तन व प्रवचन सादर करतील.
सद्भावना रॅली: युवा पि...
