Meeting of political party leaders : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक
छत्रपती संभजीनगर| 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात मा.भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त श्री.पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच राजकीय पक्षांचे विभागातील प्रमुख, प्रत...
